Maharashtra Politics । मुंबई : राज्यात लवकरच लोकसभेच्या निवडणुका (Loksabha Election) पार पडणार आहेत. सर्व पक्षांची मोर्चेबांधणी सुरु आहे. राज्यातील दोन पक्ष फुटीमुळे एकच खळबळ उडाली आहे. जनता कोणत्या पक्षाच्या बाजूने कौल देते? हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे. लोकसभेच्या निवडणुका पार पडण्यापूर्वी आता उद्धव ठाकरे गटाला (Thackeray Group) मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. (Latest Marathi News)
ठाकरे गटात असणारे खासदार कलाबेन डेलकर (Kalaben Delkar) भाजपमध्ये (BJP) जाणार असल्याची माहिती मिळत आहे. नुकतीच त्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याशी भेट झाली. ही भेट सकारात्मक झाली आहे. त्यामुळे आता डेलकर कुटुंब आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहे. त्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल. लोकसभा निवडणुकीपूर्वी कलाबेन डेलकर यांच्या निर्णयामुळे ठाकरे गटाला धक्का बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Shiv Sena Clash । ठाकरे गट आणि शिंदे गट पुन्हा सामनेसामने, ‘त्या’ वक्तव्याने तापलं वातावरण
स्व. खासदार मोहन डेलकर (Mohan Delkar) यांच्या त्या पत्नी आहेत. 2021 साली मोहन डेलकर यांनी मुंबईतील नरिमन पाँईट येथील सी ग्रीन हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती. आत्महत्येला स्थानिक प्रशासनाला जबाबदार धरलं होतं. पतीच्या मृत्यूनंतर पोटनिवडणुकीमध्ये कलाबेन डेलकर यांना उमेदवारी मिळाली होती आणि त्यात त्या निवडून देखील आल्या होत्या.