Thackeray Group News । एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यापासून ठाकरे गटाला सतत धक्क्यावर धक्के बसत आहेत. राज्यभरातील अनेक पदाधिकारी कार्यकर्ते शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करत असल्याचे दिसत आहे. असे असतानाच आता ठाकरे गटाला पुन्हा एकदा धक्का बसला आहे. पंढरपूर मध्ये ठाकरे गटाच्या जवळपास तीनशे पदाधिकारी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी शिंदे गटांमध्ये जाहीर प्रवेश केला आहे.
ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य यांच्यासह सरपंच आणि इतर सदस्यांचा समावेश आहे. यामध्ये पंढरपूरचे शिवसेनेचे नेते राजू खरे यांच्या नेतृत्वाखाली हा प्रवेश सोहळा पार पडला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित वर्षा या निवासस्थानी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे. (Thackeray Group News)
दरम्यान, ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर शिवसेनेचे नेते राजू खरे यांच्या पाठीवर थाप टाकत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समाधान व्यक्त केले. त्याचबरोबर यावेळी मुख्यमंत्र्यांनी मोहोळ- पंढरपूर मतदार संघातील राजकीय परिस्थितीवर चर्चा केल्याची माहिती मिळत आहे.
Crime News । भयानक! आधी सौंदर्याच्या जाळ्यात अडकवायची, त्यानंतर स्वतःच तक्रार करुन पुरुषांना लुटायची