भारतीय जनता पक्षाच्या (BJP) प्रदेश कार्यकारिणी समितीची बैठक (ता.१८) पुण्यात पार पडली. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा (J. P. Nadda) यावेळी उपस्थित होते. या बैठकीमध्ये शिंदे-फडणवीस सरकारच्या दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराला जे.पी. नड्डा यांनी हिरवा कंदील दिला. या बैठकीलायावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे देखील उपस्थित होते.
घराचं खोदकाम चालू होतं, सापडला करोडो रुपयांचा मुघलकालीन खजिना, अन् मजूराने…
यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुण्यात भाजपमध्ये मोठे फेरबदल करण्याची घोषणा केली होती. कसब्याचा बदला आम्ही काढणार आहोत. येत्या ३० तारखेपर्यंत पुणे भाजपात मोठे बदल होतील. असे ते म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर चर्चांना उधाण आले होते. त्याचबरोबर अनेक तर्कवितर्क देखील लावले जात आहेत.
तुळजाभवानी मंदिरातील ड्रेस कोडवरुन अजित पवार संतापले; म्हणाले, “हाफ चड्डी घालू नका, असं…”
भाजपमध्ये २०२४ पर्यंत अनेक मोठे नेते येतील, असा दावा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला होता. आणि त्यांनतर आता लगेचच दोनच दिवसांत चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे गटाच्या आमदाराची भेट घेतली. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
काँग्रेसला मोठा धक्का! माजी केंद्रीय मंत्र्यांसह निवृत्त IAS, IPS यांचा भाजपमध्ये प्रवेश
शनिवारी चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे ठाकरे गटाचे कोथरूडचे माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांची भेट घेतली आहे. त्यांच्या निवासस्थानी जाऊन चंद्रकांत पाटील यांनी भेट घेतली. मात्र ही भेट राजकीय नसल्याचं चंद्रकांत पाटलांनी स्पष्ट केलं आहे तरीदेखील राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. ठाकरे गटाला पुन्हा धक्का देण्याची तर ही तयारी ना? अशा चर्चा रंगल्या आहेत.
मोठी बातमी! मंत्रिपदासाठी राजकीय वर्तुळात रंगली या’12 नावांची चर्चा!