सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. राजकीय वातावरण अगदी ढवळून निघालं आहे. अशातच सत्ताधारी आणि विरोधीपक्षनेते एकमेकांवर सातत्याने टीका टिप्पणी करत आहेत. नुकतीच भाजपचे आमदार नितेश राणे यांनी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यांच्या या टीकेला जोरदार प्रतिउत्तर दिले जात आहे.
ब्रेकिंग! शिंदे गटाच्या दोन आमदारांचा अपघात! डंपरने दिलेल्या धडकेत कारचा चक्काचूर
ठाकरे गटाचे युवा सेना नेते शरद कोळी यांनी नितेश राणे यांच्यावर एकेरी शब्दात जोरदार टीकास्त्र सोडले आहे. ते म्हणाले, नितेश राणे तुला आई भहिणींची इज्जत जपता येत नाही. तू दिल्लीत बसलेल्या माकडांच्या जीवावर इकडे तमाशात नाचण्याच काम करतोय. नित्या तू दोन तोंडी मांडूळ आहेस. तू भाजपच्या तमाशातला नाच्या आहेस, असे म्हणत शरद कोळी यांनी खोचक टीका केली आहे.
शुभमन-साराचा ब्रेकअप? गिलचा ‘तो’ व्हिडीओ पुन्हा एकदा होतोय व्हायरल
याच दरम्यान संजय राऊत यांच्यावर केलेल्या या टिकेवरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी देखील नितेश राणे यांचा समाचार घेत टिका केली होती. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत म्हणजे महाविकास आघाडीची गौतमी पाटील आहेत. तिला बघायला लोकांना जसं आवडत, तसं आपल्यालाही बघायला लोक चॅनेल सुरू करतात अस संजय राऊत यांना वाटत, अशा शब्दात राणे यांनी टीका केली होती.
तब्बल २२ वर्षांनंतर सासू आणि जावयाचे अफेअर उघडकीस, वाचून तुम्हालाही बसेल धक्का