एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेसोबत बंडखोरी केली आणि भाजपसोबत युती करून राज्यात नवीन सरकार स्थापन केले. नंतर ठाकरे गट आणि शिंदे गट असे दोन गट पडले. यांनतर ठाकरे गटाला चांगलीच गळती लागली. अनेक नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केला. दरम्यान, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची आज मालेगावमध्ये जाहीर सभा होणार आहे. या सभेच्या माध्यमातून मुस्लिम मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा उद्धव ठाकरे यांचा प्रयत्न आहे.
इंदुरीकर महाराज यांनी गौतमी पाटीलवार केली जोरदार टीका; म्हणाले, “तिच्या कार्यक्रमात…”
शिवसेनेत उभी फुट पडल्यानंतर उद्धव ठाकरे हे महाराष्ट्रभर दौरा करत आहेत. उद्धव ठाकरे आज मालेगावमध्ये सभा घेत आहेत. या सभेची ठाकरे गटाकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. त्याचबरोबर आजच्या दिवशी तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव (Chandrashekhar Rao) यांची देखील नांदेडमध्ये (Nanded) जाहीर सभा होणार आहे. त्यामुळे या दोन सभांनी आजचा दिवस गाजणार असल्याचे चित्र दिसत आहे.
श्रद्धा वालकर हत्याप्रकरण; आफताब पूनावालाने पुन्हा बदलला वकील
ठाकरेंची तोफ मालेगावमध्ये धडाडणार –
उद्धव ठाकरे यांची नाशिक जिल्ह्यातील मालेगावमध्ये आज जाहीर सभा होणार आहे. यासाठी ठाकरे गटाकडून जोरदार तयारी देखील करण्यात आली आहे. यामुळे आता उद्धव ठाकरे सभेमध्ये कोणाचा समाचार घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मोठी बातमी! पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेत पुन्हा एकदा मोठी चूक; तरुणाने थेट…