हिडेंनबर्गने प्रसिध्द केलेल्या अहवालानंतर अदानी समूहाला ( Adani Group) चांगलीच उतरती कळा लागली आहे. अदानी समूहाला सध्या एका पाठोपाठ एक धक्के सहन करत आहे. अशातच आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. Bloomberg Billionaire index 2023 च्या टॉप लुझर्स मध्ये गौतम अदानी पहिले आले आहेत.
महत्त्वाची बाब म्हणजे Bloomberg Billionaire index च्या 2022 मध्ये प्रसिध्द झालेल्या जगभरातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत गौतम अदानी पहिल्या क्रमांकावर होते. याच वेळी टॉप लुझर्सच्या यादीत एलन मस्क पहिले होते. मात्र हिडेंनबर्गच्या एका अहवालाने सगळी समीकरणे झटक्यात बदलली आहेत.
आणि देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंच्या मदतीला धावले; अर्थसंकल्पीय अधिवेशनात घडला हा किस्सा
2022 मध्ये जगातील श्रीमंतांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर असणारे गौतम अदानी आता टॉप लूझर्स च्या यादीत टॉप ला आहेत. आणि 2022 मध्ये टॉप लुझर्सच्या यादीत असणारे एलन मस्क आता जगातील श्रीमंतांच्या यादीत टॉप ला आहेत.
शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून अजित पवार विधानसभेत कडाडले; म्हणाले…
खरंतर अमेरिकेच्या शेअरबाजारात टेस्लाच्या शेअर्समध्ये वाढ होताच एलन मस्क यांच्या कमाईत वाढ झाली. यामुळे ते श्रीमंतांच्या यादीत पहिल्या नंबरवर आले. याविरुद्ध हिंडेनबर्ग च्या अहवालानंतर शेअर बाजारात अदानी समूहाचे शेअर्स चांगलेच आपटले. यामुळे गौतम अदानींच्या कमाईत झपाट्याने घट झाली.
शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून विरोधकांची आक्रमक भूमिका; गळ्यात कांद्याची माळ घालून थेट विधान भवनात दाखल