Site icon e लोकहित | Marathi News

टायटॅनिक दाखवायला गेलेली ‘ती’ पाणबुडी माघारी आलीच नाही; पाच जण बुडाल्याची भीती

Titanic

सर्वात मोठा सागरी अपघात 14 एप्रिल 1912 च्या मध्यरात्री झाला. यामध्ये टायटॅनिक (Titanic) अटलांटिक महासागरात (Atlantic Ocean) बुडाले होते. यात एकूण 2200 प्रवासी होते तर त्यापैकी 1500 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. या अपघाताला 100 वर्षांपेक्षा जास्त काळ उलटून गेला असला तरी आजही टायटॅनिक बुडाली जागा आणि टायटॅनिक जहाज पाहण्यासाठी अनेकजण मोठ्या प्रमाणात पैसे करून जात असतात. अशीच एक टायटॅनिक जहाज पाहण्यासाठी गेलेली पाणबुडी गेली होती, परंतु माघारी आलीच नाही.(Marathi Latest News)

Delhi । दिल्लीत मेट्रोमध्ये तरुणीने केले असे कृत्य की.., व्हिडिओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल

मिळालेल्या माहितीनुसार, या पाणबुडीत पाच प्रवासी होते. ती रविवारपासून उत्तर अटलांटिक समुद्रातून बेपत्ता झाली असून सध्या तिचा शोध सुरु आहे. याच पार्शवभूमीवर अमेरिकेच्या तटरक्षक दलाने तातडीने सर्च ऑपरेशन सुरु केले आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या पाणबुडीमध्ये फक्त 96 तास पुरेल एवढाच ऑक्सिजन आहे, त्यामुळे चिंतेत भर पडली आहे.

Maharashtra Mansoon । शेतकऱ्यांनो तयारीला लागा! राज्यात ‘या’ दिवशी होणार पावसाची एन्ट्री

याचा शोध घेतला परंतु 19 जून पर्यंत बोस्टनच्या कोस्ट गार्डने (Coast Guard) मदत कार्यामध्ये पाणबुडीचा शोध लागला नाही असे सांगितले आहे. ही पाणबुडी ओशिनगेट एक्पिडिशंसकडून चालविली जाणारी एक पर्यटक पाणबुडी आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या संपूर्ण घटनेची जबाबदारी या कंपनीने घेतली आहे. परंतु एवढ्या महाकाय पाणबुडीचा शोध घेणे एक आव्हान असणार आहे.

Multibagger Stocks | गुंतवणूकदारांची चांदी! 1 लाखाचा शेअर पोहोचला 72 लाखांवर; 7,100 टक्क्यांचा बंपर परतावा

Spread the love
Exit mobile version