गौतमी पाटील (Gautami Patil) सोशल मीडियावर कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. तिच्या हटके डान्समुळे सोशल मीडियावर नेहमीच तिची चर्चा होताना दिसते. गौतमी खूप कमी वेळामध्ये प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. तिने इंस्टाग्रामवर एखादा व्हिडीओ शेअर करताच त्या व्हिडिओला चाहते भरभरून प्रेम देत असतात.
सर्वात मोठी बातमी! शरद पवार यांचा राष्ट्रवादीच्या प्रत्येक आमदाराला फोन
सध्या देखील गौतमीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ‘जिस तरहा मैने दुवाओ मैं तुझें मांगा हैं’ या गाण्यावर गौतमी लिपसिंग करताना दिसत. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.
राज्यातील सत्तांतरावर आशिष शेलार यांच मोठं वक्तव्य
या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी कमेंटचा तर पाऊसच पाडला आहे. अनेक नेटकरी हार्ट ईमोजी कमेंट करत आहेत. त्याचबरोबर काहींनी तर i love you अशा कमेंट केल्या आहेत. एका युजरने तर माझ्याशी लग्न करणार का? अशी कमेंट देखील या व्हिडीओवर केली आहे.
राज्यातील सत्तांतरावर आशिष शेलार यांच मोठं वक्तव्य