मुंबई : शेतकरी (farmers) आपल्या शेतात वेगवेगळ्या प्रकारचे हंगामी पिके (Seasonal crops) घेत असतात. या पिकांमध्ये ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ, ऊस, कापूस, मका इत्यादी नगदी आणि रब्बी पिके घेतात. तसेच खरीप हंगामामध्ये मूग, मटकी, घेवडा, सोयाबीन ही पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जात आहेत. यातून अस दिसून येत आहे की सध्या पीक पद्धती मद्ये मोठा बदल झाला असून शेतकरी भाजीपाला (vegetables) आणि फळं (fruits) शेतीकडे वळू लागला आहे.
Rohit Pawar: अग्रवाल यांनी नरेंद्र मोदींची भेट घेतली आणि त्यानंतर…” रोहित पवारांचे वक्तव्य चर्चेत
राज्यातील मागील काही दिवसांपासून अनेक भागात मुसळधार पाऊस पडत असल्याने भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणावर वाढली होती. त्यामुळे भाजीपाल्याच्या दरात सुद्धा प्रचंड वाढ झाली होती. परंतु सध्या बाजाराचे चित्र हे बदलले दिसून येत आहे. कारण सध्या राज्यात अनेक ठिकाणी पावसाने चांगली उघडीप दिली आहे. त्यामुळे बाजारात भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणावर वाढू लागली आहे. परंतु आवक वाढून सुद्धा भाजीपाल्याच्या भावात अजिबात बदल झालेला नाही. आवक वाढून सुद्धा भाजीपाल्याचे भाव हे स्थीरच राहिले आहेत.
VIDEO! अबब! खासदार महुआ साडी नेसून खेळतायेत फुटबॉल, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
पितृपंधरवडा असल्यामुळे भाजीपाल्याची मागणी वाढली आहे शिवाय दरात सुद्धा सुधारणा झाली आहे. बाजारात भेंडी, गवार, तांबडा भोपळा आणि पालेभाज्यांच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने दर काही प्रमाणात वाढले होते. पितृपंधरवडा नंतर भाजीपाल्याचे भाव कमी होतील असा अंदाज सुद्धा व्यापारी वर्गाकडून लावण्यात येत आहे.