
Asia Cup 2023 । मुंबई : येत्या 30 ऑगस्टपासून आशिया कप स्पर्धेला (Asia Cup) सुरुवात होणार आहेत. या स्पर्धेचे सामने पाकिस्तान आणि श्रीलंका या ठिकाणी खेळवले जाणार आहेत. भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री, माजी मुख्य निवडकर्ता एमएसके प्रसाद आणि संदीप पाटील यांनी या स्पर्धेसाठी संघाची निवड केली असून आयसीसी (ICC) स्पर्धेच्या तयारीच्या दृष्टीने हे सामने खुप महत्त्वाचे आहेत. (Latest Marathi News)
Maharashtra Rain Update । विदर्भात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा, जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज
दरम्यान, नेपाळ क्रिकेट टीमने आपला संघ जाहीर केला आहे. नेपाळ क्रिकेट टीमची (Team Nepal) जबाबदारी ही रोहित पौडेल (Rohit Paudel) याच्याकडे देण्यात आलेली आहे. त्याचे वय 20 वर्ष असून त्याने आतापर्यंत 27 आंतरराष्ट्रीय सामन्यांचे नेतत्व केले आहे. तर अर्जुन सऊद (Arjun Saud) रोहितच्या कॅप्टन्सीमध्ये खेळताना दिसणार आहे. त्याने आतापर्यंत नेपाळकडून 12 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केले असून त्यापैकी 9 वनडे सामन्यांमध्ये 174 धावा केल्या आहेत. (Asia Cup Team Nepal)
असा आहे आशिया कपसाठी नेपाळ संघ
रोहित पौडेल (कॅप्टन), आसिफ शेख, अर्जुन सऊद, ललित राजबंशी, कुशल भुर्टेल, भीम सार्की, दीपेंद्र सिंह ऐरी, कुशल मल्ला,संदीप लामिछाने, गुलशन झा, किशोर महतो, सोमपाल कामी, करण केसी,आरिफ शेख, प्रतीस जीसी, संदीप जोरा आणि श्याम ढकाल.
Politics News | “हे फक्त घोषणा करणारं सरकार”, राष्ट्रवादीच्या नेत्याचा राज्य सरकारवर निशाणा