सोलापूर : मागील काही दिवसांपासून काँग्रेस व राष्ट्रवादी मध्ये चढाओढीचे वातावरण आहे. मध्यंतरी रोहित पवार यांनी राष्ट्रवादीकडून सोलापूर मतदारसंघावर दावा केला होता. तेव्हापासून दोन्ही पक्षात चांगलीच जुंपली आहे. या पार्श्वभूमीवर आमदार प्रणिती शिंदे यांना प्रश्न विचारला असता त्यांनी कोण रोहित पवार? असे म्हंटले आहे. यामुळे सोलापूर लोकसभेच्या ( Solapur Loksabha) जागेवरून रोहित पवार आणि प्रणिती शिंदे यांच्यात शाब्दिक युद्ध रंगले आहे.
बच्चू कडूंचा खळबळजनक दावा, म्हणाले “येत्या १५ दिवसांत…”
रोहित पवारांची ही पहिलीच टर्म आहे, काही जणांमध्ये पोरकटपणा असतो, काही दिवस जाऊ द्या, त्यानंतर त्यांच्यामध्ये मॅच्युरिटी येईल, असं सांगत प्रणिती शिंदे यांनी रोहित पवारांना सुनावले आहे. महाविकास आघाडीमध्ये सोलापूर लोकसभेची जागा आघाडीत काँग्रेसकडून लढवली जाते. परंतु, या जागेबाबत आता रोहित पवारांनी (Rohit Pawar) भाष्य केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.
मोठी बातमी! आदिलच्या अटकेनंतर राखी सावंतला मिळतायेत धमक्या
सोलापूर दौऱ्यावर असताना सिद्धेश्वर कारखान्याच्या राजकारणाबद्दल बोलताना म्हणाले होते की, “येथील आमदार आणि खासदार बदलले पाहिजे.” याशिवाय त्याआधी शेतकरी मेळाव्यामध्ये आले असताना देखील सोलापूरला काँग्रेसऐवजी राष्ट्रवादीचा खासदार व्हावा, अशी मागणी आपण पक्षनेतृत्वाकडे करु असे रोहित पवार म्हणाले होते.
महेंद्रसिंग धोनी झाला शेतकरी, फोटो शेअर करत चाहत्यांना तिला धक्का!