Uddhav Thackeray । ठाणे येथे उद्धव ठाकरेंच्या सभेच्या ठिकाणी मनसे (MNS) कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या गाडीवर शेण फेकले. याशिवाय बांगड्या, टोमॅटोही फेकण्यात आले. यामुळे राजकारणात मोठी खळबळ उडाली. दरम्यन आता जितेंद्र आव्हाड यांनी या हल्ल्याचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. उद्धव ठाकरेंच्या गाडी वर झालेला हल्ला प्राणघातक हल्ला असल्याचे जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी म्हंटले आहे.
Ajit Pawar । त्यामुळे मी राजकारणातून संन्यास घेईन…, अजित पवारांच धक्कादायक वक्तव्य
ट्विट करत त्यांनी लिहिले की, “खालील तीन व्हिडिओज् मधून आपल्याला स्पष्ट होईल की, ठाण्याचे पोलीस सध्या काय मानसिकतेत आहेत. मी अजिबात पोलिसांना दोष देत नाही. पण, अधिकाऱ्यांनी तरी कणा असल्यासारखे वागावे. अधिकाऱ्यांच्या होणाऱ्या कणाहीन हालचाली पाहता पोलिसांच्या मनोबलाचे खच्चीकरण होत आहे. अन् आपला अधिकारीच एवढा झुकतोय तर आपण का ताठ व्हावे, अशीच मानसिकता पोलीस दलाची झाली आहे. पण, अशाने महाराष्ट्राची मान खाली जातेय. ज्या पोलीस खात्याचे सबंध जगभर कौतूक केले जायचे; त्यांच्यावर आता नामुष्की ओढावतेय, हे कोणाच्याच लक्षात येत नाही. असं ते म्हणाले आहेत.
Supriya Sule । सर्वात मोठी बातमी! सुप्रिया सुळेंचे फोन आणि व्हॉट्सॲप हॅक
त्याचबरोबर पुढे ते म्हणाले, “जे काही झाले ते महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला शोभणारे नाही..विरोधी पक्षातील नेत्याचा जीवजर इतका धोक्यात असेल तर महाराष्ट्रात किती अराजकता माजली आहे, हे लक्षात घ्यावे. तुम्ही काहीही बोललात; कोणाची टिंगल टवाळी केली तर सगळ्यांनी ऐकून घ्यायचे; पण, तुम्हाला कोणी काय बोलले की, तुम्ही गाड्या फोडणार , सभा उधळून लावण्याची धमकी देणार , माझ्याशी गाठ आहे, अशी भाषा वापरणार! चलता है, फक्त एवढेच लक्षात ठेवा की सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीच जन्माला आलेले नाही”.
उद्धव ठाकरेंच्या गाडी वर झालेला प्राणघातक हल्ला
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) August 10, 2024
खालील तीन व्हिडिओज् मधून आपल्याला स्पष्ट होईल की, ठाण्याचे पोलीस सध्या काय मानसिकतेत आहेत. मी अजिबात पोलिसांना दोष देत नाही. पण, अधिकाऱ्यांनी तरी कणा असल्यासारखे वागावे. अधिकाऱ्यांच्या होणाऱ्या कणाहीन हालचाली पाहता पोलिसांच्या… pic.twitter.com/o0WOzUkwwR
Ajit Pawar । अजित पवारांवर हल्ला होणार, गुप्तचरांना मिळाले इनपुट; धक्कादायक माहिती समोर