सध्या राज्याच्या राजकारणात एकीकडे ठाकरे आणि शिंदे गटाचा वाद चालू आहे तर भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) मुख्यमंत्री (Chief Minister) झाला तर हे पद कोणाला मिळणार याच्या चर्चा आत्तापासूनच रंगल्या आहेत.
बच्चू कडू यांचा दिलदारपणा; दिव्यांग मुलांच्या मदतीला आले धावून
मुंबईमध्ये राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयबाहेर मागच्या चार पाच दिवसापूर्वी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil), आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांचे भावी मुख्यमंत्री म्हंणून बॅनर लागले होते. ही गोष्ट जुनी होत नाही तोपर्यंत लगेचच राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांचं देखील बॅनर मुंबईमध्ये लावण्यात आले.
Facebook: फेसबुकच्या ब्ल्यू टिकसाठी मोजावे लागणार आता ‘इतके’ रुपये!
या बॅनरवर सुप्रिया सुळे यांचा उल्लेख महाराष्ट्राच्या पहिल्या भावी महिला मुख्यमंत्री असा करण्यात आला आहे. पण हे पोस्टर लावताच लगेचच लगेचच पोलिसांनी हे पोस्टर काढल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्राच्या पहिल्या भावी महिला मुख्यमंत्री सौ. सुप्रियाताई सुळे. नाद नाय करायचा! असं या बॅनरवर लिहिण्यात आले होते.
आणि तिला घराबाहेर काढण्यासाठी चक्क पोलीस आले; मागील तीन वर्षांपासून मूलासह घरात होती बंदिस्त