मुंबई: मुंबई (Mumbai High court) उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने (Nagpur Bench) पोलिस ठाण्यात व्हिडिओ बनवणे गुन्हा नाही असे स्पष्ट केले आहे. इतकंच नाही तर सरकारी गोपनीयता कायद्यानुसार आता निषिद्ध ठिकाणी पोलिस ठाण्याचा (police station) समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे पोलिस स्टेशनमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग (video recording) गुन्ह्याच्या श्रेणीत ठेवता येणार नाही. खंडपीठाने दिलेल्या आदेशात OSA च्या कलम 3 आणि कलम 2(8) चा संदर्भ दिला असून प्रतिबंधित ठिकाणी हेरगिरीशी संबंधित आहे.
काय सांगता! एका मराठमोळ्या चाहत्याने चक्क 57 भाषांमध्ये कारवर छापलं रतन टाटांंच नाव
त्यामुळे पोलिस ठाणे हे कायद्यात नमूद केलेले प्रतिबंधित ठिकाण नाही, असे खंडपीठाने नमूद केले. यावेळी खंडपिठाने एक महत्वाची टिप्पणी दिली. दरम्यान न्यायालयाच्या म्हणण्यानुसार, ऑफिशियल सिक्रेट्स ऍक्ट 2(8) मध्ये दिलेली निषिद्ध ठिकाणाची व्याख्या प्रासंगिक आहे. ही एक सर्वसमावेशक व्याख्या आहे. ज्यामध्ये पोलीस ठाण्याचे ठिकाण किंवा आस्थापना ज्याला प्रतिबंधित ठिकाण म्हणून मानले जाऊ शकत नाही.
Vanita Kharat: “लग्नाची पहिली रात्र आणि…”, वनिता खरातच्या जाहिरातीचा व्हिडीओ व्हायरल, पाहा VIDEO
दरम्यान, जुलै 2022मध्ये न्यायमूर्ती मनीष पितळे आणि न्यायमूर्ती वाल्मिकी मिनेझिस यांच्या खंडपीठाने रवींद्र उपाध्याय नावाच्या व्यक्तीविरुद्ध मार्च 2018 मध्ये पोलिस ठाण्यात व्हिडिओ रेकॉर्ड केल्याबद्दल ऑफिशियल सिक्रेट्स ऍक्ट (OSA) अंतर्गत दाखल केलेला खटला रद्द केला. दरम्यान आता वरील तरतुदींचा विचार करून, न्यायालयाने अर्ज दाखल करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध कथित गुन्ह्याचा खटला चालवला जाऊ शकत नाही असं नमूद केलं आहे. फिर्यादीनुसार, उपाध्याय हे त्यांच्या पत्नीसोबत त्यांच्या शेजाऱ्याशी झालेल्या वादाच्या कारणावरून वर्धा पोलिस ठाण्यात होते.
ब्रेकिंग! बँकांचे नवीन नियम, आता फोन पे आणि गुगल पेवर लागणार शुल्क
दरम्यान उपाध्याय यांनी शेजाऱ्याविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्याचवेळी उपाध्याय यांच्याविरोधातही उलट तक्रार दाखल करण्यात आली होती. दरम्यान त्यावेळी उपाध्याय हे त्यांच्या मोबाईलवरून पोलिस ठाण्यात सुरू असलेल्या चर्चेचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करत होते. त्याचवेळी उपाध्याय व्हिडिओ रेकॉर्डिंग करत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. दरम्यान न्यायालयाने एफआयआर रद्द करून या प्रकरणात उपाध्याय यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले.