अजित पवार (Ajit Pawar) यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये (NCP) दोन गट पडले आहेत. त्यामुळे या पक्षाच्या कार्यकर्त्यांना कोणत्या गटाची साथ द्यावी असा प्रश्न पडत आहे. मागील काही दिवसांपासून हे दोन्ही गट येणार असल्याच्या चर्चांना चांगलेच उधाण आले आहे. त्यावरून आता खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी सूचक विधान केले आहे. (Latest Marathi News)
“राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हे दोन्ही गट एकत्र येतात का हे पाहण्यासाठी तुम्हाला काही काळ थांबावं लागणार आहे. काळाच्या ओघात याची उत्तरे मिळतील,” असे वक्तव्य तटकरे यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यामुळे आता येणाऱ्या काळात या दोन्ही गटाची काय भूमिका असे हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
Viral Video । मुंबईकरांचे हाल संपता संपेना! कंबरेएवढे पाणी आणि वाहतूक कोंडी, पहा व्हायरल व्हिडिओ
दरम्यान, अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची दोनवेळा भेट घेतली. या भेटीदरम्यान या गटाने शरद पवार यांना भाजपच्या नेतृत्वातील एनडीएत येण्याची विनंतीही केली होती. परंतु शरद पवार यांनी त्याला नकार दिला असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
Pune News । धक्कादायक! बंदी असताना प्रवास करणे आले अंगलट, तिघांसह कार कोसळली धरणात
हे ही पहा