सर्वसामान्य जनतेला दिलासा देणारी एक बातमी आहे. कारण नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची (State Cabinets) महत्त्वाची बैठक पार पडली. दीड तासाच्या या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. तीसपेक्षा जास्त प्रस्तावांना मान्यता देत एकूण १९ हजार ३०० कोटींच्या खर्चाला मंजूरी दिली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या निर्णयाचे कौतुक केले जात आहे. (Latest Maarthi News)
जेवण तयार केले नाही म्हणून रागाच्या भरात पतीने पत्नीला डांबले आणि केले भयानक कृत्य
यामध्ये राज्यातील वंचित आणि उपेक्षित वर्गासह अनेक जिल्ह्यांत वेगवेगळ्या योजना व अस्थापनांच्या उभारणीच्या निर्णयाला आज मान्यता देण्यात आली. तसेच राज्यात वेगवेगळ्या शहरात ‘आपला दवाखाना’ साठी २१० कोटींची तरतूद करतानाच संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेसाठी गावखेड्यातील वंचित वर्गासाठी प्रत्येक महिन्याला ५०० रुपयांची वाढ केली आहे.
विठ्ठलाच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, भीषण अपघातात एक जागीच ठार तर ६ जण जखमी
‘गाळमुक्त नदी अन् गाळयुक्त शिवार’ या धोरणाखाली नदीतील गाळ उपसा करण्यासाठी तब्बल ६०३४ कोटीची तरतूद तसेच महात्मा फुले आरोग्य योजनेअंतर्गत (Mahatma Phule Health Yojana) तब्बल १२ कोटी जनतेला पाच लाखांपर्यंतचे आरोग्य कवच जाहीर केले आहे.
फडणवीसांच्या गौप्यस्फोटानंतर संजय राऊतांचे मोठे वक्तव्य; म्हणाले “तुमचा प्रयोग…”