Santosh Bangar । सर्वात मोठी बातमी! संतोष बांगर यांच्याविरोधात गुन्हा दाखल, ‘ती’ चूक पडली महागात

The biggest news! A case has been filed against Santosh Bangar, 'that' mistake was costly

Santosh Bangar । हिंगोली : शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर सतत वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत येतात. अनेकदा ते वक्तव्यामुळे अडचणीतही येतात. नुकतीच शिवसेना उद्धव बळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची हिंगोलीत सभा पार पडली. त्यानंतर जिल्ह्यात संतोष बांगर यांच्या वतीने कावड यात्रा काढली होती. त्यावेळी बांगर यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. (Latest Marathi News)

Crime News । त्याचा अपघातात मृत्यू झालाय असं सगळ्यांना वाटलं पण २ वर्षांनी चिमुरड्याने आणले आईचं घाणेरडं सत्य बाहेर

ठाकरेंच्या सभेला उत्तर देण्यासाठी संतोष बांगर यांनी काढलेल्या कावड यात्रेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Social media) चांगला व्हायरल होत आहे. महादेवाला अभिषेक करून बांगर यांच्या गळ्यात आणि दंडावरही कवड्यांच्या माळा, अंगावर भगवे कपडे, गळ्यात फुलांचे हार, हातात झांज वाजवत त्यांची ही कावड यात्रा चालली होती. यावेळी विविध भागांतून आलेल्या कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती. (Santosh Bangar Viral Video)

IMD Alert । पुढील महिन्याच्या सुरूवातीला पाऊस पडणार? जाणून घ्या पुणे हवामान खात्याचा अंदाज

या दरम्यान त्यांचा सत्कार करण्यात आला. समर्थकांनी त्यांना तलवार भेट दिली. परंतु त्यांना तलवारीचा मोह आवरता आला नाही. भेट दिलेली तलवार त्यांनी म्यानातून बाहेर काढत नाचवली. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्याविरोधात कळमनुरी पोलीस ठाण्यामध्ये आर्मस ॲक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे.

Asia Cup 2023 । आशिया स्पर्धेपूर्वी रोहितचं मोठं विधान, म्हणाला; “पुढील दोन महिने…”

Spread the love