आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी नुकतीच दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे. गिरीश बापट यांच मागच्या चार दिवसापूर्वी निधन झाले आहे. त्यांच्या कुटुंबाला सांत्वन देण्यासाठी आमदार बच्चू कडू यांनी गिरीश बापट यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल मोठं वक्तव्य केलं.
‘या’ कारणामुळे महाविकास आघाडीच्या बैठकीला नाना पटोले राहणार गैरहजर!
सरकार स्थापन होऊन राज्यात नऊ महिने होऊन गेले तरी देखील दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही. या विस्तारावरून बच्चू कडू यांनी अनेकदा नाराजी व्यक्त केली आहे. आता या विस्ताराबाबत आमदार बच्चू कडू यांना प्रश्न विचारला असता त्यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे.
छोटू दादा झाला आचारी अन् पाच रुपयांना विकली बिर्याणी थाळी! पाहा व्हायरल Video
याबाबत बोलताना आमदार बच्चू कडू म्हणाले, “मंत्रिमंडळाच्या विस्ताराची गरज नसून आमचे २० मंत्री सक्षम आहेत. २० मंत्र्यांमध्ये सुद्धा मंत्रिमंडळ चालू शकतं. हे या सरकारने दाखवून दिलं”, अशी मोठी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली आहे. त्यांच्या या प्रतिक्रियेनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख भाजपमध्ये प्रवेश करणार