
मागच्या काही दिवसापासून अनेक राजकीय नेत्यांना जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. मागच्या काही दिवसांपूर्वी नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. दरम्यान आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे.
प्रवासादरम्यान उलट्या किंवा मळमळ होत असेल तर ‘हे’ उपाय नक्की आजमावून बघा
माहितीनुसार, पुण्यातील वारजे मधून हा फोन आल्याचं उघड झालं आहे. ११२ हेल्पलाईन क्रमांकावर हा फोन आला असल्याचं समजत आहे. “मी एकनाथ शिंदे यांना उडवणार आहे” असे बोलून कॉल कट करण्यात आला आहे. त्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.
आता या प्रकरणाबाबत पोलिसांनी तपास चालू केला आहे. माहितीनुसार, पोलिसांनी धमकी देणाऱ्या व्यक्तीला अटक केली आहे. त्याचबरोबर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील पोलिसांना त्वरित तपास करण्याचे आदेश दिले.
गौतमी पाटीलच्या मदतीसाठी सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांचा पुढाकार; म्हणाल्या, “गरीब घरातून…”