अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) तिच्या पोशाखांमुळे सोशल मीडियावर वर्चस्व गाजवते. तिच्या विचित्र पोशाखामुळे ती अनेकदा वादाच्या भोवऱ्यात अडकते. तसेच सोशल मीडियावर (Social media) तिला तिच्या कपड्यांमुळे ट्रोल देखील केले जाते. मागच्या काही दिवसांपूर्वी उर्फीला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यांनतर आता पुन्हा एकदा उर्फी जावेदला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
मुंबई इंडियन्सला मोठा धक्का! रोहित शर्मा प्लेइंग इलेव्हनमधून दुखापतीमुळे बाहेर
अज्ञात व्यक्तीकडून उर्फीला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी उर्फीने पोलिसांत तक्रार देखील दाखल केली आहे. याबाबत उर्फीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून स्टोरी शेअर केली आहे. इन्स्टा स्टोरीमध्ये एक व्हिडिओ देखील आहे. ज्यामध्ये उर्फी स्वतःला जीवे मारण्याच्या धमकी मिळाल्याचा दावा करताना दिसतेय.
16 आमदार अपात्र झाले तरीही एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री राहणार; अजित पवारांचा मोठा दावा
आता या प्रकरणाबाबत उर्फीने पोलिसात तक्रार दाखल केली असून या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत. दरम्यान, मागच्या काही दिवसापूर्वी देखील उर्फीला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. या प्रकरणी नवीन रंजन गिरी नावाच्या व्यक्तीला पोलिसांनी अटक देखील केली होती.