सध्या एक अतिशय महत्वाची बातमी समोर आली आहे. माफिया अतिक अहमद आणि अशरफ (Mafia Atiq Ahmed and Ashraf) यांची प्रयागराजमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रयागराज मेडिकल कॉलेजजवळ ही घटना घडली आहे. दोघांवर 10 पेक्षा जास्त गोळ्या झाडण्यात आल्या. या प्रकरणी पोलिसांनी ३ जणांना अटक केली आहे.
लग्न कधी करणार? मुलगी कशी पाहिजे? आदित्य ठाकरे हसत म्हणाले…
या घटनेचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर देखील समोर आले आहेत ज्यामध्ये अतिक अहमद आणि त्याचा भाऊ पत्रकारांशी बोलत असताना कोणीतरी अतिकच्या डोक्यात गोळी मारली आहे. आणि नंतर दुसऱ्याच क्षणी त्याच्या भावालाही गोळी मारली.
या घटनेची गंभीर दखल घेत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तातडीने उच्चस्तरीय बैठक बोलावून संपूर्ण प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. तीन सदस्यीय चौकशी आयोग स्थापन करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. याप्रकरणी तीन हल्लेखोरांना अटक करण्यात आली आहे. त्याचबरोबर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
शरद पवारांना मोठा धक्का! भुजबळांचा विश्वासू नेता शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश करणार