महाराष्ट्रामध्ये मागच्या काही दिवसापासून दंगली होण्याचे प्रमाण वाढले आहे. मागच्या काही दिवसापूर्वी अहमदनगर जिल्ह्यात दंगल झाली होती. त्यांनतर आता कोल्हापुरात शिवराज्याभिषेक दिनी आक्षेपार्ह स्टेटस ठेवण्यात आल्यानंतर काल दुपारपासून कोल्हापूरमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेचा निषेध म्हणून कोल्हापूरमध्ये हिंदुत्ववादी संघटना एकवटल्या आहेत. (Latest Marathi News)
ब्रेकिंग! भंगार गोदामाला भीषण आग; नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरु…
समाज माध्यमावर वादग्रस्त स्टेटस् ठेवल्यामुळं कोल्हापूरमध्ये दोन समाजामध्ये वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे हिंदुत्ववादी संघटनांनी आज कोल्हापूर बंदची हाक दिली आहे. पोलिसांनी संबंधितांविरोधात कडक कारवाई करावी या मागणीसाठी ठिय्या आंदोलन देखील सुरु केलं आहे.
लव्ह जिहादबाबत शरद पवार यांचे मोठे वक्तव्य; म्हणाले, “या फाजील गोष्टींना…”
कोल्हापूरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी या घटनेत दोषी असणाऱ्या आणि आक्षेपार्ह स्टेटस ठेवणाऱ्या 6 जणांना अटक करण्यात आली असल्याची माहिती दिली आहे.