Indurikar Maharaj | विनोदी कीर्तनकार म्हणून राज्यभरात प्रसिद्ध असणारे इंदुरीकर महाराज अनेकदा अडचणीत येत असतात. आता पुन्हा एकदा त्यांच्या अडचणी वाढल्या आहे. काही दिवसांपूर्वी केलेल्या लिंगभेदाबाबतच्या वक्तव्यामुळे त्यांच्या विरोधात औरंगाबाद खंडपीठाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. यापूर्वी ते बेताल वक्त्यावरून चर्चेत आले आहेत.
Ajit Pawar | “…त्यासाठी अजितदादांनी आमच्यासोबत यावं”, शिंदे गटातील बड्या नेत्याची ऑफर
सम तारखेला आणि विषम तारखेला संबंध आला तर मुला मुलगा किंवा मुलीचा कशाप्रकारे जन्म होतो? त्यावरून त्यांनी एक वक्तव्य केले होते. यावरून अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि जिल्हा शैल्य चिकित्सक यांनी इंदुरीकर महाराजांविरोधात तक्रार दाखल केली होती.
Mira Road Murder | मृत्यूनंतर तिचे न्यूड फोटो काढले अन्…, आरोपी मनोजचा खुलासा वाचून बसेल धक्का
या तक्रारीनंतर जेएफएमसी कोर्टात हे प्रकरण चालू होते. पुढे हे प्रकरण सेशन कोर्टात गेले आणि सेशन कोर्टात हे प्रकरण हा गुन्हा रद्द करण्यात आला. त्यामुळे पुन्हा एकदा अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि राज्य शासनाच्या वतीने औरंगाबाद खंडपीठात धाव घेण्यात आली. याप्रकरणी आज औरंगाबाद खंडपीठाने इंदुरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.