
महाराष्ट्रामध्ये मागच्या काही दिवसापासून दंगली होण्याचे प्रमाण वाढले आहे. मागच्या काही दिवसापूर्वी अहमदनगर जिल्ह्यात दंगल झाली होती. त्यांनतर आता कोल्हापुरात शिवराज्याभिषेक दिनी आक्षेपार्ह स्टेटस ठेवण्यात आल्यानंतर काल दुपारपासून कोल्हापूरमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेचा निषेध म्हणून कोल्हापूरमध्ये हिंदुत्ववादी संघटना एकवटल्या आहेत. (Latest Marathi News)
आता याबाबत नवीन अपडेट समोर आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित कंपन्यांना इंटरनेट बंद (Internet Service) करण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत माहिती पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित (Mahendra Pandit) यांनी दिली आहे.
समाज माध्यमावर वादग्रस्त स्टेटस् ठेवल्यामुळं कोल्हापूरमध्ये दोन समाजामध्ये वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे हिंदुत्ववादी संघटनांनी आज कोल्हापूर बंदची हाक दिली आहे. पोलिसांनी संबंधितांविरोधात कडक कारवाई करावी या मागणीसाठी ठिय्या आंदोलन देखील सुरु केलं आहे.