Nitin Desai । ज्येष्ठ कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी आपल्या स्टुडिओमध्ये आपले जीवन संपवले. (Nitin Desai Death) त्यांच्यावर असणाऱ्या कर्जामुळे (Loan) त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतला असावा, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यांच्या या निर्णयाने सगळ्यांना खूप मोठा धक्का बसला आहे. सध्या या प्रकरणाची पोलिसांकडून कसून चौकशी करण्यात येत आहे. (Latest Marathi News)
Prithvi Shaw । पृथ्वी शॉच्या अडचणी संपता संपेना! पहा व्हायरल व्हीडिओ
पोलिसांनी नितीन देसाई यांच्या मृत्यू प्रकरणी एडलवाईज कंपनीचे (Edelweiss Company) चेअरमन रशेष शहा, स्मित शाह, जितेंद्र कोठारी, आर के बन्सल आणि केऊर मेहता यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. देसाई यांच्या पत्नी नेहा देसाई (Neha Desai) यांनी खालापूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. सूत्रांच्या माहितीनुसार,लवकरच या सर्वांना चौकशीला बोलावले जाऊ शकते. देसाई हे वन टाईम सेटलमेंटसाठी तयार होते. त्या संदर्भात त्यांनी एडलवाईज कंपनीसोबत भेटही घेतली होती.
WI vs IND 1st T20I । अर्रर्र.. पराभवानंतर भारतीय संघाला आणखी एक मोठा धक्का
परंतु या कंपनीने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही, उलट 180 कोटींचं मूळ कर्जाचं व्याज 252 कोटी होण्यापर्यंत वाट पाहिली. स्टुडिओचा ताबा घेण्यासाठी कंपनी प्रयत्न करत होती, असा आरोप गंभीर देसाईंच्या कुटुंबीयांनी केला आहे. त्यामुळे आता या कंपनीच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.