Ajit Pawar | अजित पवार यांनी २ जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये (NCP) आजवरची सर्वात मोठी फूट पाडली. आपल्या ८ सहकारी नेत्यांसोबत त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. दरम्यान, अजित पवार (Ajit Pawar) यांच्या बंडाची ही पहिलीच वेळ नाही, तर त्यांनी यापूर्वी एकदा बंड केले होते. परंतु ते पुन्हा पक्षात परतले. अशातच विरोधी पक्षपदाच्या खुर्चीवर बसलेले अजित पवार अचानक शिंदे फडणवीस (Shinde Fadnavis) सरकारमध्ये सहभागी झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. (Latest Marathi News)
आगामी निवडणुकांना अवघे काही दिवस शिल्लक असताना अजित पवारांनी अचानक बंड का केले? असा सवाल अजूनही उपस्थित केला जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार अजित पवार हे दिवाळीनंतर बंड करणार होते. राज्यात महाविकास आघडीच्या सभा होत होत्या. त्यांना चांगला प्रतिसाद मिळत होता. परंतु त्यांना आताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बाहेर पडण्यास सांगण्यात आले.
Rain in Maharashtra | राज्यातील नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, अनेक भागात पूरस्थिती
याच पार्श्वभूमीवर, अजित पवार आणि त्यांच्या गटाकडून सलग दोन दिवस शरद पवारांची (Sharad Pawar) भेट घेण्यात आली होती. “आम्ही चूकलो, आम्हाला माफ करा,” असे या गटाने शरद पवारांना सांगितलं. या भेटीत शरद पवार यांना NDA च्या बैठकीला आणण्याचे प्रयत्न केले. परंतु शरद पवार यांनी त्याला विरोध दर्शवला. परंतु अजित पवार गटाने शरद पवार आमचे नेते असल्याने त्यांचे दर्शन घेण्यासाठी आम्ही आलो असल्याचे स्पष्ट केले.
कोथिंबीर पिकाच्या शेतीतून शेतकरी बनला लखपती, 6 एकरात कमावले तब्बल 12 लाख रुपये