आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! विधानसभा अध्यक्षांनी बजावली शिंदे गटाच्या 40 आमदारांना नोटीस

Narvekar

राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेमध्ये (Shivsena) बंड करून भाजपसोबत (BJP) युती केली. परंतु अजूनही एकनाथ शिंदे यांच्या अडचणीत वाढताना दिसत आहेत. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह एकूण 40 आमदार आणि ठाकरे गटाच्या 14 आमदारांना नोटीस बजावली आहे. या आमदारांना अपात्रतेसंदर्भात आपली बाजू मांडता यावी त्यासाठी ही नोटीस आहे. (Latest Marathi News)

PM Kisan Tractor Scheme | शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी! सरकारी मदत घेऊन निम्म्या किमतीत खरेदी करा ट्रॅक्टर, कसे ते जाणून घ्या..

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाकडून (Supreme Court) आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांना अपात्र ठरवावे यासाठीची ठाकरे गटाचे नेते सुनील प्रभू (Sunil Prabhu) यांनी विधानसभा अध्यक्षांकडे याचिका दाखल केली आहे. याबाबत आता लवकरच राहुल नार्वेकर निर्णय घेणार आहेत.

Rahul Gandhi | “…अन् राहुल गांधींनी पुन्हा जिंकले मन”, शेतात चालवला ट्रॅक्टर आणि केली भात लावणी

तसेच या आमदारांना आपली बाजू मांडण्यासाठी 7 दिवसांची मुदत दिली आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदारांना अपात्र केले जाणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. अशातच राहुल नार्वेकर यांनी या आमदारांना नोटीस बजावली आहे. त्यामुळे हे आमदार अपात्र होणार का याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Government Scheme । पशुपालकांनो..गाई पाळून मिळवा लाखोंचे अनुदान; सरकारकडून पुन्हा ‘या’ योजनेला सुरुवात

हे ही पहा

Spread the love