40 MLA Disqualification Case । मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी गेल्या वर्षी शिवसेना पक्षात (Shivsena) बंड करून भाजप पक्षासोबत (BJP) युती करून सरकार स्थापन केले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेलेल्या त्या 40 बंडखोर आमदारांना शिवसेनेने अपात्रतेची नोटीस बजावली होती. याबाबतचा निर्णय घेण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांना दिला आहे.
परंतु शिंदे गटाच्या आमदारांना काहीसा दिलासा मिळाला आहे. कारण त्यांनी राहुल नार्वेकर यांच्याकडे या 40 आमदारांनी मुदत वाढवून मागितली होती. त्यांची ही मागणी आता राहुल नार्वेकर यांनी मान्य केली आहे. या आमदारांना दोन आठवड्यांची मुदत देण्यात आली असून आपले मत मांडण्यासाठी त्यांच्याकडे ही शेवटची संधी असणार आहे.
सध्या राज्याचे पावसाळी अधिवेशन (Monsoon session) सुरु आहे. अधिवेशनानंतर या सुनावणीला सुरुवात होणार आहे. परंतु पुन्हा एकदा सर्व राज्याचे लक्ष असलेल्या अपात्रतेसंदर्भात सुनावणी लांबणीवर पडली आहे. जर राहुल नार्वेकर यांनी या आमदारांना अपात्र ठरवले तर पुन्हा एकदा राज्यात राजकीय भूकंप येऊ शकतो.