Maharashtra Politics । मुंबई : सध्या राज्याचे राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे, अगोदर शिवसेना (Shivsena) आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये (NCP) दोन गट पडले आहेत. खरी शिवसेना कोणाची हा वाद निवडणूक आयोगाकडे (Election Commission) पोहोचला. निवडणूक आयोगाने त्यांचे चिन्ह गोठवले होते. त्यानंतर दोन्ही गटांना निर्णय येईपर्यंत तात्पुरतं चिन्ह घेण्यास सांगितले होते. आता राष्ट्रवादीबाबतही असेच होऊ शकते. (Latest Marathi News)
सूत्रांच्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसचे चिन्ह गोठवले जाऊ शकते. केंद्रीय निवडणूक आयोग ६ ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडणूक चिन्हाबाबत सुनावणी पार पडणार आहे. या सुनावणीदरम्यान चिन्ह गोठवले जाण्याची शक्यता आहे. जर चिन्ह गोठवले तर दोन्ही गटांना शिवसेनेप्रमाणे दुसरे पक्षचिन्ह घ्यावे लागेल. सूत्रांच्या माहितीनुसार दोन्ही गटांकडून तशी तयारी सुरु आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्षाचे चिन्ह आपलेच आहे, असा दावा अजित पवार गटाकडून केला आहे. शिवाय आपल्यालाच जास्त आमदारांचा पाठिंबा आहे, असाही दावा अजित पवार (Ajit Pawar) गटाकडून करण्यात येत आहे. दरम्यान, या दोन्ही गटांकडून आमदार अपात्र करा, अशी मागणी सतत केली जात आहे. त्यामुळे आता निवडणूक आयोग येत्या ६ ऑक्टोबर रोजी कोणता निर्णय घेणार? याकडे दोन्ही गटासह राज्याचे लक्ष लागले आहे.