मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर खरी शिवसेना कोणाची हा वाद अजूनही मिटला नाही. अशातच दिग्गज राजकीय नेतेमंडळी आणि कार्यकर्ते पक्षांतरण करत आहेत. उद्या शिवसेनेचा वर्धापनदिन आहे. परंतु त्यापूर्वी ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. काल शिशिर शिंदे यांनी ठाकरे गटाच्या उपनेतेपदाचा राजीनाम्याचं पत्र उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवले आहे. त्यानंतर आता विधानपरिषद आमदार मनिषा कायंदे शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
सर्वात मोठी बातमी! प्रकाश आंबेडकर यांना अटक करा, हिंदू महासंघाची मोठी मागणी
मागच्या अनेक दिवसापासून ठाकरे गटाला चांगलीच गळती लागली आहे. अनेकजण शिंदे गटामध्ये प्रवेश करत आहेत. ठाकरेंच्या महाशिबिराच्या दिवशी विधानपरिषद आमदार मनिषा कायंदे शिवसेनेत प्रवेश करण्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसल्याच बोललं जात आहे.
ठाकरेंना पुन्हा मोठा धक्का! वर्धापनदिनापूर्वी ‘या’ बड्या नेत्याने दिला राजीनामा
मागच्या अनेक दिवसापासून अनेक नगरसेवक, पदाधिका-यांनी ठाकरेंची साथ सोडली आहे. ठाकरेंकडे मोजकेच आमदार आहेत. त्यामुळे ठाकरेंकडे असणारे आमदार देखील हळूहळू शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करत आहेत. त्यामुळे ठाकरे गटाची चिंता वाढली आहे. याचा परिणाम आगामी निवडणुकांवर दिसून येईल.