सध्या एक अतिशय मोठी बातमी समोर आली आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar ) यांनी आज अचानक औरंगाबादमध्ये जावून औरंगजेबाच्या समाधीला भेट दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आले आहे. प्रकाश आंबेडकर यांनी आज अचानक औरंगाबादमध्ये जावून औरंगजेबाच्या समाधीला भेट दिली त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
मागच्या काही दिवसापासून औरंगजेबावरुन राज्याच्या राजकारणातील वातावरण चांगलेच तापलेलं आहे. या सर्व गोष्टी चालू असतानाच प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबाच्या समाधीला भेट का दिली? असा सवाल उपस्थित झाला आहे. अनेक तर्कवितर्क देखील लावले जात आहेत. मात्र याबाबत एक वृत्तवाहिनीशी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
‘…म्हणून सुप्रिया मला अमिताभ बच्चन म्हणाली’, अखेर अजित पवार बोललेच
“औरंगाबादच्या समाधींना भेट दिली आहे. या ठिकाणी आणखी एक ऐतिहात्सिक वास्तू आहे. ती वास्तूदेखील पाहायला मी आलेलो आहे”, असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं आहे. मात्र आता यामुळे नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
Sharad Pawar | शरद पवार यांनी धनगर समाजासाठी एकही काम केले नाही; भाजप आमदार पुन्हा बरळले