
सध्या राज्याच्या राजकारणामध्ये अनेक मोठ मोठ्या घडामोडी घडत आहेत. अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसोबत बंडखोरी केल्यापासून राजकीय समीकरण बदलल्याचं चित्र दिसत आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या गटाचे सर्व आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या भेटीसाठी गेले असल्याची माहिती समोर आली आहे. (BREAKING NEWS)
महिन्याला 60 हजार पगार, घरही मोफत! तरीही या कारणामुळे अनेकजण करत नाहीत ‘ही’ नोकरी
काल अजित पवार गटाच्या मंत्र्यांनी शरद पवार यांची भेट घेतली त्यानंतर लगेचच आज आमदारही शरद पवारांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून अनेक तर्कवितर्क देखील लावले जात आहेत. यशवंतराव चव्हाण सेंटरवर ही भेट होत आहे. महत्त्वाचं म्हणजे स्वत: अजित पवार आज देखील शरद पवारांची भेट घेत आहेत.
शेतकरी संकटात असताना काही टोळ्यांची हप्तेखोरी सुरु, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधकांचा घेराव
आता या भेटीत नेमकी काय चर्चा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, आज राज्याचं पावसाळी अधिवेशन सुरु झालं आहे. आज सभागृहाचं कामकाज झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बैठक झाली. आणि या बैठकीनंतर सर्व आमदार शरद पवारांच्या भेटीसाठी रवाना झाले.
Weather Update । देशासह राज्यात आठवडाभर कोसळणार मुसळधार पाऊस, हवामान खात्याने दिला इशारा