गेल्या वर्षी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये बंड करून भाजपसोबत (BJP) युती केली. त्यावेळी सुरुवातीला शिंदेंसोबत 16 आमदार सुरतला गेले होते. तेव्हा त्या आमदारांना 48 तासांमध्ये उत्तर द्यावे लागणार नाहीतर तुम्हाला अपात्र ठरवण्यात येईल, अशी एक नोटीस पाठवण्यात आली होती. त्यावरून मागील काही दिवसांपासून राज्यात मोठा सत्तासंघर्ष निर्माण झाला आहे. (Latest Marathi News)
हिरडगाव फाट्यावर अज्ञाताने धडकावले हरीण, तरुणांनी केली मदत; वनविभागाची टीम घटनास्थळी दाखल
या नोटीसविरोधात शिंदे गटाने थेट सर्वोच्च न्यायालयाचा (Supreme Court) दरवाजा ठोठावला होता. दरम्यान, त्यानंतर गुवहाटी येथे शिंदेच्या गटात मूळ शिवसेनेतील 40 आमदार गेल्याने त्यांना अपात्रतेची नोटीस पाठवली होती. ज्यात सुरतला गेलेल्या आमदारांच्याच नावांचा उल्लेख करण्यात आला आहे. यावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली असून कोर्टाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दोन आठवड्यांची मुदत दिली आहे.
Ajit Pawar | अखेर ठरलं! अजित पवारांना मिळणार मंत्रालयात दालन, सांभाळणार ‘या’ खात्याची जबाबदारी
आमदारांच्या निलंबनाबाबत राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी तातडीने निर्णय घेण्यात यावा यासाठी सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करावा यासाठी ठाकरे गटाकडून याचिका दाखल करण्यात आली होती. यावर आज आज सर्वोच्च न्यायालयाने निकाल देत विधानसभा अध्यक्षांनी 2 आठवड्यात लेखी उत्तर देण्याची नोटीस बजावली आहे.
धक्कादायक! दिल्ली बुडाली, सुप्रीम कोर्टाच्या दारात साचले पाणी