गौतमी पाटीलला ( Gautami Patil) ओळखत नाही. असा माणूस अवघ्या महाराष्ट्रात शोधून सापडणार नाही. खूप कमी काळात गौतमीने प्रसिद्धी मिळवली आहे. राज्यातील विविध छोट्या-मोठ्या गावांत गौतमी पाटीलचे कार्यक्रम होत असतात. यात्रांच्या व समारंभांच्या निमित्ताने गौतमी पाटीलचे कार्यक्रम आयोजित केले जातात. दरम्यान आता गौतमी पाटील अडचणीत सापडली आहे.
PM Kisan । शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा १४ हप्ता मिळणार ‘या’ दिवशी; समोर आली मोठी अपडेट
गौतमी पाटीलच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. बार्शी पोलीस ठाण्यात तिच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे.
गौतमीच्या विरोधात पहिल्यांदाच तक्रार दाखल करण्यात आल्याने गौतमी पाटीलच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. गौतमीचा बार्शीमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी कार्यक्रमाचे आयोजक राजेंद्र गायकवाड यांनीच बार्शी पोलिसात तक्रार अर्ज दिला आहे. गौतमी पाटील हिने माझी फसवणूक करून मला मानसिक त्रास दिला. असल्याचं गायकवाड यांनी तक्रारीमध्ये म्हंटल आहे.
महाराष्ट्रातील दंगलींमागे नेमकं कोण? फडणवीस म्हणाले, “100 टक्के हे…”