राज्यात बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. त्याचबरोबर हवामान विभागाने येत्या दोन दिवस पाऊस पडणार आल्याचा अंदाज वर्तविला होता. यापार्श्वभूमीवर आता उत्तर महाराष्ट्रासह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये येत्या ४ तासांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभा राहिले आहे.
शरद पवार यांना मोठा धक्का! अतिशय जवळच्या विश्वासू सहकाऱ्यावर गुन्हा दाखल
कृषी विभागाने शेतकऱ्यांना आपल्या पिकाची काळजी घेण्याचे आव्हान केले आहे. कोल्हापूर, धुळे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
अयोध्या दौऱ्यावरून अजित पवारांचा एकनाथ शिंदेंना टोला; म्हणाले, “मला देखील जायचं आहे पण…”
येत्या तीन ते चार तासांमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील अहमदनगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, तसेच सोलापूर या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्याचबरोबर कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये देखील पाऊस पडणार आहे. आणि उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, नाशिक, औरंगाबाद या ठिकाणीही पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय! CNG आणि PNG गॅसच्या किंमतींमध्ये ‘इतक्या’ रुपयांनी कपात होणार…