बॉलीवूडचा दबंग म्हणजेच सलमान खान नेहमीच चर्चेत असतो. सलमान खान सध्या त्याच्या ‘टायगर ३’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटासाठी तो अनेक वर्षांपासून जोमाने काम करत होता. अलीकडेच या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान सन्मान खानला दुखापत झाल्याचे समोर आला आहे.
पुण्यातील ट्राफिक कर्मचारी निलंबित; लाच घेताना कॅमेरात कैद
सलमान खान सोशल मीडियावर सक्रिय असतो. अलीकडे सलमानने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. जो सध्या चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. सलमानने शेअर केलेल्या फोटोमध्ये सलमानच्या खांद्याला दुखापत झालेली दिसत असून त्यावर बँडेज लावलेले दिसत आहे. मात्र ही दुखापत डंबेल उचलल्यामुळे झाल्याचे म्हटले जात आहे.
Samsung ची धमाकेदार ऑफर १ लाख रुपयांचा फोन फक्त २२ हजारांना, पाहा भन्नाट ऑफर
पोस्ट करताना सलमान खानने लिहिलं की, जेव्हा तुम्हाला असं वाटतं की साऱ्या जगाचा ओझं तुमच्या खांद्यावर आहे, तेव्हा तो म्हणतो जग वगैरे बाजूला ठेवा, पाच किलोचे डंबेल उचलून दाखवा आधी… टायगर जखमी आहे. सलमानच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊसच पडला आहे. एक युजरने म्हटले की, “यार चित्रपट गेला खड्ड्यात, आधी स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष दे.”