मागच्या काही दिवसापासून राज्याच्या राजकारणामध्ये अनेक मोठमोठ्या घडामोडी घडत आहेत. अजित पवार (Ajit Pawar) राष्ट्रवादीमध्ये नाराज असून ते भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा देखील राजकीय वर्तुळात सुरु आहेत. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) खळबळ माजली आहे.
राष्ट्रवादीचे महत्वाचे मानले जाणारे नेते अजित पवार (Ajit Pawar) 40 आमदारांसोबत भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात चांगल्याच रंगल्या आहेत. दरम्यान आता पक्ष फुटीची चर्चा रंगल्यानंतर शरद पवार (Sharad Pawar) यांनी सावध भूमिका घेतल्याची माहिती समोर आली आहे.
प्राजक्ता माळी आणि सलमान खान अडकणार लग्न बंधनात? प्राजक्ता म्हणाली…
अजित पवार हे बंड पुकारणार असल्याच्या चर्चा चालू असल्यामुळे आता शरद पवार सावध झाले आहेत. कारण मागच्या दोन दिवसापूर्वी काही आमदारांनी उघडपणे अजित पवार यांना पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे खरच हे सर्व भाजपसोबत जातील का? याची चाचपणी आता शरद पवार यांनी सुरु केली आहे.
राजकीय वर्तुळात खळबळ! अजित पवारांची चलबिचल; चर्चांना उधाण
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद पवार यांनी राष्ट्रवादीमधील आमदारांना फोनवर बोलून माहिती घेत असल्याची माहिती समोर आली आहे. या आमदारांचं मत जाणून घेण्याचं काम शरद पवार आता करत आहेत. अशी माहिती समोर आली आहे.
‘या’ माणसाकडे आहेत सर्वात जास्त मोबाईल, पाहून व्हाल थक्क; गिनिज बुक मध्ये देखील झालीय नोंद