राज्याच्या राजकारणात कधी काय होईल ते सांगता येत नाही. सत्तेत बसलेले पदावरून पायउतार होतात तर कधी विरोधात बसलेले सत्तेत सहभागी होतात. मागील वर्षी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेना (Shivsena) फोडत भाजपसोबत (BJP) युती केली तर २ जुलै रोजी अजित पवार यांनी आपल्या ८ सहकारी नेत्यांसोबत मंत्रीपदाची शपथ घेतली. महाविकास आघाडीमध्ये असणाऱ्या हे दोन्ही पक्ष फुटल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. (Latest Marathi News)
अशातच आता काँग्रेस पक्षाबाबत (Congress) भारतीय जनता पक्षाने एक धक्कादायक दावा करण्यात आला आहे. “लवकरच काँग्रेस पक्षदेखील महविकास आघाडीमधून बाहेर पडेल. आघाडीत राहून काही फायदा नाही, अशी त्यांची भावना झाली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे काँग्रेस पक्षच महाविकास आघाडी फुटायला जबाबदार ठरणार असून काँग्रेसमधील काही आमदार सत्तेत येण्याची दाट शक्यता आहे”, असा दावा भाजप खासदार रणजिससिंह नाईक निंबाळकर (Ranjis Singh Naik Nimbalkar) यांनी केला आहे.
त्यांच्या वक्तव्यावरून राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. रणजिससिंह नाईक निंबाळकर यांच्या दाव्यावरून काँग्रेस कशाप्रकारे प्रत्त्युर देतो याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, राज्यात लवकरच विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. जर काँग्रेस पक्ष फुटला तर या निवडणुकांमध्ये वेगळं चित्र पाहायला मिळेल.
हे ही पहा