एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यापासून शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) हे सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत येत असतात. सध्या देखील ते चर्चेत आले आहेत परंतु यावेळी कारण जरा वेगळं आहे. एका व्यक्तीकडून त्यांची एक दोन हजार नाही तर तब्बल ७ कोटी ६६ लाख रुपयांची फसवणूक (Fraud) करण्यात आली आहे. याप्रकरणी त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. (Latest Marathi News)
Agriculture News । धक्कादायक! साखर कारखानदारांनी थकवले FRP चे 800 कोटी रुपये, होणार कडक कारवाई
याबाबत सविस्तर माहिती अशी की, घोडबंदर (Ghodbunder) येथील एक जमीन खरेदी करण्यासाठी प्रताप सरनाईक यांनी एका व्यक्तीशी संपर्क साधला होता. मार्टीन बर्नार्डो, कोरिया असं या व्यक्तीचं नाव असून सरनाईक यांनी जमीनीच्या व्यवहारासाठी पहिल्या टप्प्यात साडेतीन कोटी रुपयांची रक्कम दिली होती. परंतु त्यांच्यावर नावावर ती जमीन झालीच नाही.
Agriculture News । दिलासादायक बातमी! आता 5 गुंठ्यांचीही होणार खरेदी-विक्री, असा करा अर्ज
विशेष म्हणजे २०२१ पासून या व्यवहारासाठी प्रताप सरनाईक सातत्याने प्रयत्न करत असून संबधित व्यक्ती टाळाटाळ करत आहे. अखेर सरनाईक यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच आर्थिक गुन्हे शाखेकडेही तक्रार करण्यात आली आहे.
Tomato Price Hike । टोमॅटोने बदलले नशीब! ‘या’ गावातील 12 शेतकरी बनले करोडपती तर 55 लखपती
हे ही पहा