
राज्यातील राजकिय वर्तुळात महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप यांचे मेतकूट जमत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. अदानी प्रकरणात शरद पवारांनी काँग्रेसच्या भूमिकेला विरोध करत भाजपला पाठिंबा दिला होता. तेव्हापासून राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत मवाळ भूमिकेत दिसत आहे. एवढेच नाही तर NCP च्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नरेंद्र मोदींना (Narendra Modi) आपला आवडता पंतप्रधान म्हंटले होते.
राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप आघाडीबाबत शरद पवारांचे वक्तव्य; म्हणाले….
उद्धव ठाकरे व देवेंद्र फडणवीस यांच्यात फडतूस काडतूस शब्दावरून वाद सुरू आहे. या वादावरून देखील शरद पवारांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखती दरम्यान आपले मत व्यक्त केले आहे. कोणत्याही व्यक्तीवर वैयक्तिक टीकाटिपण्णी करू नका. असे शरद पवार म्हणाले आहेत. दरम्यान, मागच्या काही दिवसापासून महाविकास आघाडीमध्ये खदखद सुरू असल्याच्या बातम्या देखील समोर आल्या. यामुळे अनेक तर्कवितर्क देखील लावले जात आहेत.
श्रद्धा वालकर प्रकरणात समोर आली मोठी अपडेट, वडील गंभीर आरोप करत म्हणाले…
आता या सर्व घडामोडी घडत असताना एक अतिशय महत्वाची माहिती समोर आली आहे. उद्धव ठाकरे हे शरद पवारांच्या निवासस्थानी ‘सिल्व्हर ओक’वर रवाना झाले आहेत. या ठिकाणी ते शरद पवारांची भेट घेणार आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आहे. शरद पवारांच्या निवासस्थानी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत देखील उपस्थित असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये नेमकी कोणत्या विषयावर चर्चा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
श्रद्धा वालकर प्रकरणात समोर आली मोठी अपडेट, वडील गंभीर आरोप करत म्हणाले…