मागच्या काही दिवसापासून अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला होता. या अवकाळी पावसासह गारपीठ देखील मोठ्या प्रमाणात झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. शेतकऱ्यांचे कांदा, गहू, हरभरा, द्राक्षे, केळी अशा अनेक पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. दरम्यान, बीड जिल्ह्याला अवकाळी पावसासह गारपिटीचा मोठा फटका बसला आहे.
बिबट्याच्या झडपेत ७ वर्षाच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू!
वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, गारपीट झाली आहे. नद्या देखील दुथडी भरून वाहत आहेत. जिल्ह्यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचबरोबर वीज पडून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर दोन शेतकरी जखमी झाले आहेत.
‘नॉट रिचेबल’ असल्याच्या बातम्यांवर अजित पवार यांनी दिल स्पष्टीकरण; म्हणाले…
बीड जिल्ह्यात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात गारपीट झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले आहे शेतातील गहू, द्राक्षे, ज्वारी, आंबा, मोसंबी, कलिंगड, टरबूज, भाजीपाला यासह अनेक पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी अडचणीत सापडला आहे.
धक्कादायक! भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात अल्पवयीन मुलगा गंभीर जखमी