अचानक तब्बेत बिघडल्याने प्रसिद्ध गायक आणि अभिनेते अन्नू कपूर (Annu Kapoor) यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. माहितीनुसार, छातीत दुखू लागल्यामुळे त्यांना रुग्णालयामध्ये दाखल केले होते. दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र आता त्यांची तब्बेत ठीक असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
कपिल शर्माच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी!
रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच अन्नू कपूर यांचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हायरल झालेल्या फोटोमध्ये अन्नू कपूर रुग्णालयातील डॉक्टर आणि तेथील स्टाफसोबत दिसत आहेत. फोटो पाहून लगेच लक्षात येत आहे की अन्नू कपूर यांची तब्बेत आता ठीक आहे. या व्हायरल फोटोमध्ये अन्नू कपूर आनंदी दिसत आहेत.
संत तुकाराम महाराजांची पत्नी त्यांना रोज मारायची, बागेश्वर बाबांचे पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य
दरम्यान, अन्नू कपूर अभिनेतेच नाहीत तर ते एक प्रसिद्ध गायक देखील आहेत. त्याचबरोबर ते दिग्दर्शक, रेडिओ जॉकी आणि टीव्ही होस्टही आहेत. त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपटनामध्ये काम केले आहे. जवळपास १०० पेक्षा जास्त चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. त्यांनी अनेक पुरस्कार देखील जिंकले आहे.
लव जिहादच्या नावाखाली समाजामध्ये विष पेरण्याच काम सुरू – अजित पवार