Delhi Services Bill । दिल्ली सरकारच्या अधिकारांना अडचणीत आणणारे विधेयक आज राज्यसभेत, कोण मारणार बाजी?

The bill that will put the powers of the Delhi government in trouble today in the Rajya Sabha, who will kill the bet?

Delhi Services Bill । नवी दिल्ली : आज दिल्ली सेवा विधेयक (Delhi Services Bill) राज्यसभेत (Rajya Sabha) चर्चा आणि मंजुरीसाठी सादर करण्यात येणार आहे. दरम्यान, काल हे विधेयक लोकसभेत (Lok Sabha) मंजूर झाले आहे. कारण येथे सरकारचं संख्याबळं मजबूत होते त्यामुळे तिथं या विधेयकाला (Bill) अडचण आली नाही. त्यानंतर आज हे विधेयक राज्यसभेत मांडले जाणार आहे. याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. (Latest Marathi News)

Nitin Desai Death । नितीन देसाई मृत्यू प्रकरणाची कसून चौकशी केली जाईल, अजित पवार यांचे आश्वासन

हे विधेयक आता लोकसभेनंतर राज्यसभेत मंजूर झाल्यास दिल्ली सरकारच्या प्रशासकीय अधिकारांना कात्री लावणाऱ्या वादग्रस्त अध्यादेशाची जागा घेईल याच पार्श्वभूमीवर राज्यसभेतील आजच्या कामकाजाचा दिवस महत्त्वपूर्ण ठरेल. परंतु, राज्यसभेत या विधेयकाच्या मंजुरीसाठी सरकारला काहीशी कसरत करावी लागणार आहे.

Crime News । धक्कादायक! बेदम मारहाण करत टोमॅटो उत्पादक शेतकऱ्याचे चोरट्यांनी लुटले साडेचार लाख रुपये

राज्यसभेतील एकूण खासदारांची संख्या 238 असून त्यापैकी एनडीए (101) + बीजेडी (9) = 110 तर INDIA आघाडीकडे एकूण 100 मते आहेत. राष्ट्रपती नियुक्त 5 खासदार आणि इतर पक्षांचे 22 खासदार आहेत. त्यापैकी वायएसआर काँग्रेस पक्षांचे ९ आणि बीआरएसचे ७ खासदार आहेत. परंतु या दोन्ही पक्षांनी या विधेयकाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली नाही.

Crime News । महाराष्ट्र हदरला! अत्याचार करून चिमुकलीची हत्या

दरम्यान आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल हे मागील काही दिवसांपासून या विधेयकाविरोधात वातावरणनिर्मिती करण्यासाठी दौरे केले असून त्यांनी देशातील सर्व महत्त्वाच्या विरोधी पक्षांच्या प्रमुखांची भेट घेतली होती. आज या विधेयकाला मंजुरी मिळेल का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

Devendra Fadnavis । गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रकाश आंबेडकर यांना दिली क्लीनचिट; नेमकं प्रकरण काय?

Spread the love