वाढदिवस (Birthday) हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा दिवस असतो. त्यामुळे अनेकजण तो मोठ्या जल्लोषात साजरा करत असतो. या दिवशी केक कापण्यासोबतच डीजे, वेगवेगळे स्प्रे आणि फायर गनचाही वापर करण्यात येतो. परंतु वर्ध्यातील (Wardha) एका तरुणाला अशाच प्रकारे स्प्रे आणि फायर गनचा वापर करणे चांगलेच महागात पडले आहे. त्याला त्याच्याच वाढदिवसादिवशी जीवनदान मिळाले आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social media) चांगलाच व्हायरल होत आहे. (Latest Marathi News)
मोठ्या दवाखान्यात बोगस डॉक्टरने महिला पेशंटसोबत केलं नको ते कृत्य; घटना वाचून बसेल धक्का
याबाबत अधिक माहिती अशी की, वर्ध्याच्या सिंधी मेघे येथील ही घटना घडली आहे. रितीक वानखेडे (Ritik Wankhede) असे या बर्थडे बॉयचं नाव असून त्याच्या वाढदिवसाच्या पार्टीचे आयोजन केले होते. त्यावेळी तो आपल्या मित्रांसोबत केक कापत असताना त्याच्या मित्रांनी अंगावर स्प्रे मारला. तसेच त्याच्या पाठीमागे फायर गनही चालू होती. या फायर गनची ठिणगी त्याच्या तोंडावर पडली आणि आग लागली. प्रसंगावधान राखत ही आग विझवण्यात आली. त्याला लगेचच रुग्णालयात हलवले.
परंतु या घटनेत आगीमुळे भाजल्याने रितीकच्या कानाला आणि नाकाला किरकोळ जखम झाली आहे. दरम्यान मागच्या वर्षी चंद्रपुर (Chandrapur) येथील भिसी गावातही अशीच मोठी दुर्घटना घडली होती. केक कापत असताना त्यावर असणाऱ्या “स्पार्कल कॅण्डल”चा स्फोट झाल्याने एका दहा वर्षाच्या मुलाला मोठी दुखापत झाली होती.
Manisha Kayande । अखेर मनिषा कायंदे यांनी सोडलं मौन; पक्ष सोडण्याचे सांगितले ‘हे’ मोठे कारण