सोशल मीडिया हे सध्याच्या काळातील संवादाचे व मनोरंजनाचे आवडते साधन आहे. यावर अपडेट राहण्याकडे आजकाल सर्वांचाच कल असतो. तसेच सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी देखील लोक प्रयत्न करत असतात. यामुळे यावर कधी मजेशीर व्हिडीओ तर कधी समाजिक संदेश देणारे व्हिडीओ व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका तरुणाने चक्क मुंबईच्या दोन पोलीस अधिकाऱ्यांसमोर गाणे गाऊन दाखवले आहे.
‘या’ प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने राज ठाकरे यांना मारण्याचा रचला होता कट
शिव नावाच्या एका इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन (Instagram Account) हा व्हिडीओ शेअर झाला आहे. ‘मरिन ड्राइव्ह, मुंबई’ असे या व्हिडिओच्या कॅप्शन मध्ये लिहिण्यात आले आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण गिटार वाजवत ब्रह्मास्त्र ( Bramhastra) चित्रपटातील ‘केसरिया’ हे गाणे गात आहे. विशेष म्हणजे दोन पोलीस अधिकाऱ्यांसमोर या तरुणाने गाणे गायले आहे. या तरुणाचे गाणे ऐकून ते पोलीस अधिकारी हसत आहेत.
जनावरांचे दूध वाढवण्यासाठी करा ‘हे’ नैसर्गिक उपाय!
शेतकऱ्याने लिहिले मुख्यमंत्र्यांना रक्ताने पत्र
मुंबई पोलिसांनी सुद्धा त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर केला आहे. यासाठी ‘मुंबईकर आणि मुंबई पोलीस, ग्रेट लव्ह स्टोरिया…’ असे कॅप्शन दिले आहे. यावर नेटकऱ्यांनी देखील प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘तरी सुद्धा तुला दंड भरावा लागेल’ तसेच ‘या मुलाचा आवाज खूप छान आहे.’ अशा कमेंट करण्यात आल्या आहेत.
पुणे बरबाद व्हायला वेळ लागणार नाही! राज ठाकरेंचे मोठे विधान…