आजपासून राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु

The budget session of the state legislature begins today

आज सोमवारपासून राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन (Budget Session of the State Legislature) सुरु होणार आहे. हे अधिवेशन वादळी ठरण्याची चिन्हे आहेत. शिवसेना आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदेंना मिळाले यांनतर राजकीय वातावरण चांगलेच तापले. त्यामुळे अर्थसंकल्प अधिवेशनामध्ये नागरिकांच्या प्रश्नांवर चर्चा होण्याऐवजी या अधिवेशनात राजकारणाची चर्चा जास्त होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अधिवेशनात कशाची चर्चा होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

गौतमी पाटीलचा व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या ३ आरोपींविरोधात गुन्हा दाखल

शेतकरी वर्गाचे प्रश्न त्यांच्या समस्या, विद्यार्थ्यांचे प्रश्न, कायदा आणि सुव्यवस्थेचा उडालेला बोजवारा यावरून सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्याचा इशारा विरोधकांनी दिला असतानाच विरोधकांचा समाचार घेऊ, असे थेट आव्हानच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी दिले आहे.

“…त्यामुळे अजित पवार यांच्या पोटात फार दुखत आहे”, देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल

दरम्यान, अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेल्या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार घातला. यामध्ये विरोधकांनी सरकारचा उल्लेख घटनाबाह्य असा केला आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा उडालेला बोजवारा, मागच्या काही दिवसात मंत्र्यांच्या वाहनांच्या ताफ्यावर झालेली दगडफेक किंवा जीवे मारण्याची दिलेली धमकी यावरून राज्यात कायद्याचे राज्य अस्तित्वात आहे का, असा सवाल अ जित पवार यांनी केलाय.

मोठी बातमी! दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अटक

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *