Mumbai Fire । इमारतीला भीषण आग! होरपळून दोघांचा मृत्यू तर ९ जणांना वाचवण्यात यश

Mumbai Fire

Mumbai Fire । मुंबईतील आगीच्या घटनांचे सत्र काही केल्या थांबत नाही. अशीच एक घटना मुंबईतील गिरगाव चौपाटी (Girgaon Chowpatty) भागात घडली आहे. गिरगावमधील एका चार मजली इमारतीला भीषण आग (Fire) लागली आहे. या भीषण आगीत दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच तातडीने अग्निशमनदलाच्या (Fire brigade) १५ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. दोन तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. (Mumbai Fire News)

Assembly Election Result 2023 । बिग ब्रेकिंग! चारही राज्यांचे धक्कादायक कल हाती, कुणाला किती मिळाल्या जागा?

ही आग कशामुळे लागली, याबाबत अजूनही कोणतीच माहिती मिळाली नाही. पोलिसांनी या प्रकरणाची नोंद केली आहे. पोलीस आणि अग्निशमनदलाच्या जवानांकडून आगीमागचे कारण शोधले जात आहे. दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल झाला असून या घटनेमुळे परिसरातील लोकांमध्ये काही वेळ भीतीचे वातावरण पसरले होते. (Latest Marathi News)

Sanjay Raut । “शिवसेना आणि राष्ट्रवादीला संपवणे हे संघाचे षडयंत्र”, संजय राऊतांचा खळबळजनक आरोप

या आगीमध्ये दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे तर नऊ जणांना रेस्क्यू करुन वाचवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. त्यांच्यावर रुग्णालयात यश आले आहे. एका रहिवाशी बिल्डींगमध्ये चार मजली इमारतींच्या तिसऱ्या मजल्यावर भीषण आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलिसांकडून सुरु आहे.

Mahad News । मुलगा झाल्याचा आनंद आला अंगलट! मित्रांसोबत पोहायला गेला अन् झालं असं काही की…

Spread the love