बैलगाडा शर्यतींचा डाव पुन्हा रंगणार; सुप्रीम कोर्टाची सुनावणी

The bullock cart races will be played again; Supreme Court hearing

पूर्वीच्या काळी शेतातील कामांसाठी बैलांचा वापर केला जात होता. शेतीच्या कामांसाठी आता ट्रॅक्टर आले असले तरी आजही ग्रामीण भागात बैलांची क्रेझ कायम आहे. बैलगाडा शर्यत ( Bullock Cart Race) हे यामागचं एक मोठं आणि महत्त्वाचे कारण समजले जाते. मागील काही दिवसांत बैलगाडा शर्यतींवर सरकारकडून बंदी घालण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची माहिती समोर आली असून राज्यात लवकरच बैलगाडा शर्यतींचा धुरळा उडणार आहे.

शेतकऱ्याने धरले अधिकाऱ्याचे पाय; म्हणाला अडचण दूर करा अन्यथा…

बैलगाडा शर्यतींबाबत दाखल करण्यात आलेल्या पुनर्विचार याचिकेवर काल ( दि.24) सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. खरंतर सुप्रीम कोर्टाने याआधीच बैलगाडा शर्यतींसाठी परवानगी दिली होती. परंतु, याबाबत कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र, काल झालेल्या सुनावणी दरम्यान अँनिमल वेल्फेअर ऑफ इंडियाकडून ( Animal welfare Of India) बैलगाडा शर्यतींवर बंदी घालण्याची गरज नाही असे स्पष्ट करण्यात आले. यावेळी CUPA प्राणी संघटनेच्या वतीने अँडव्होकेट सिद्धार्थ लुथ्रा हे बाजू मांडण्यासाठी उपस्थित होते.

बिग ब्रेकिंग! चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा उद्रेक; ‘या’ ठिकाणी लॉकडाऊनही केलं

या सुनावणी दरम्यान अँनिमल वेल्फेअर ऑफ इंडिया बैलगाडा शर्यतींसाठी सकारात्मक होते. त्यामुळे बैलगाडा शर्यतींना हिरवा कंदील मिळण्याची शक्यता आहे. याबाबतची पुढील सुनावणी मंगळवारी पार पडणार आहे अशी माहिती अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष रामकृष्ण टाळकर यांनी दिली. बैलगाडा शर्यतींवरील बंदी लवकरच उठणार असल्याने बैलगाडा शर्यत प्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

डिझेलचा टँकर व ट्रॅक्टरचा भीषण अपघात; तब्बल दीड तास सुरू होता अग्नितांडव

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *