
सध्या एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. विठ्ठलवाडी आगारातून अमळनेरच्या दिशेने निघालेल्या एसटी बसचा कसारा घाटात एक्सलेटरच पेडल तुटला. मात्र यांनतर ड्रायव्हर आणि कंडक्टरने एक अनोखी शक्कल लढवली ती पाहून तुम्हीही त्यांना सलाम ठोकाल. बसचा अचानक एक्सलेटर तुटल्याने ड्रायव्हर आणि कंडक्टरने दोरीचा वापर करत बस नाशिकला नेली. (The accelerator pedal of the ST bus going from Vitthalwadi Agar towards Amalner broke at Kasara Ghat.)
पुण्यात अजित पवारांचे मुख्यमंत्री म्हणून बॅनर झळकले; राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चांना उधाण
सध्या याचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, चालक गाडी चालवतोय आणि कंडक्टर दोरी हातात पकडून नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत होता.
हा सर्व प्रकार पाहून बसमधील प्रवाशांचा संताप अधिक विकोपाला गेला. त्यांनतर बसमधील नागरिकांनी गोंधळ घालत धावत्या बसमधली ही दृश्य आपल्या मोबाईलमध्ये कैद करून घेतली आणि याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
खुशखबर! फक्त पॅनकार्डवर मिळणार ५० हजारांचे कर्ज; जाणून घ्या सविस्तर