शेतकऱ्यांना ज्यातून फायदा होतो त्यासाठी केंद्र सरकार (Central government) वेगवेगळ्या योजना राबवत असतात. दरम्यान मागील काही दिवसांपासून केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी (Farmer) पीएम किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Samman Nidhi Yojana) राबवत आहे. महत्वाची बाब म्हणजे या योजनेअंतर्गत सध्या देशातील लाखो शेतकरी फायदा घेत आहेत. शेतकऱ्यांना आतापर्यंत पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे 11 हफ्ते मिळाले आहेत. परंतु शेतकऱ्यांना या योजनेचा 12वा हफ्ता मिळण्यासाठी विलंब होत आहे. या हफ्त्याची शेतकरी वाट पाहत आहे.
प्रियकरासोबत मिळून पत्नीने पतीची चाकूने गळा चिरून केली हत्त्या, कारण वाचून व्हाल थक्क
योजनेत असा केला मोठा बदल
दरम्यान शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या १२व्या हप्त्याचे पैसे देण्यापूर्वी केंद्र सरकारने या योजनेत मोठा बदल (Big change in plan) केला आहे. मात्र या बदलाचा करोडो लाभार्थ्यांना फटका बसणार आहे. ते म्हणजे आतापासून तुम्ही लाभार्थी पोर्टलवर जाऊन आधार क्रमांकाद्वारे तुमच्या हप्त्याची स्थिती तपासू शकणार नाही. तर तुम्हाला आतापासून तुमच्या हप्त्याची स्थिती तपासण्यासाठी तुमचा नोंदणीकृत मोबाइल क्रमांक टाकावा लागेल. प्रधानमंत्री किसान योजनेत यापूर्वी मोबाइल किंवा आधार क्रमांकावरून स्थिती जाणून घेता येत होती. पण, त्यानंतर नियम बदलण्यात आले आणि केवळ आधारद्वारे स्थिती तपासण्याची सूट देण्यात आली.
मोठी बातमी! शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला येणाऱ्यास मिळणार 1 हजार रुपये?
द्रुत तपासणी –
1) सर्वप्रथम तुम्हाला pmkisan.gov.in वर जावे लागेल. त्यानंतर एक पेज ओपन होईल.
2) या पेजवर तुमचा पीएम योजनेत नोंदणीकृत मोबाईल क्रमांक टाका.
3) कॅप्चा कोड एंटर करा.
4) पुढे मोबाईलवर मिळालेला OTP टाका आणि Get Details वर जा.
5) आता तुमचा नोंदणी क्रमांक आणि नाव स्क्रीनवर दिसेल.
प्रियकरासोबत मिळून पत्नीने पतीची चाकूने गळा चिरून केली हत्त्या, कारण वाचून व्हाल थक्क
नोव्हेंबरमध्ये येऊ शकतो 12वा हप्ता
ऑगस्ट ते नोव्हेंबर दरम्यान 12वा हप्ता येण्याची वेळ आहे. तसेच मागील वर्षी याच कालावधीत ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला योजनेशी संबंधित हप्त्याचे 2000 रुपये आले होते. परंतु यावेळी हप्ता मिळण्यास विलंब होत आहे. केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेत कोणत्याही प्रकारची फसवणूक टाळण्यासाठी सरकारने ई-केवायसी अनिवार्य केले आहे. महत्वाची बाब म्हणजे पूर आणि दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांना 12व्या हफ्त्यासाठीची प्रतीक्षा जड होत आहे.
खुशखबर! शेतकऱ्यांना सिंचनासाठी मिळणार निधी; राज्य सरकारने घेतला महत्वाचा निर्णय